DLM ADVT

0



        मुंबईदि. ५ : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागात सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहेअसे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

            अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.राज्यात १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र (३६११८७२.५ एकर) बाधित झाले आहे. त्यापैकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत. यामध्ये दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे. 

          सर्वाधिक बाधित जिल्हे : नांदेड – ,२०,५६६ हेक्टर,वाशीम – ,६४,५५७ हेक्टरयवतमाळ - १,६४,९३२ हेक्टरधाराशिव - १५०,७५३,बुलढाणा – ८९,७८२ हेक्टर,अकोला - ४३,८२८ हेक्टर,सोलापूर - ४७,२६६ हेक्टर,हिंगोली - ४०,००० हेक्टर क्षेत्रामध्ये बाधित पिके सोयाबीनमकाकापूसउडीदतूरमूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपालाफळपिकेबाजरीऊसकांदाज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.एकूण बाधित जिल्हे नांदेडवाशीमयवतमाळबुलढाणाअकोलासोलापूरहिंगोलीधाराशिवपरभणी,अमरावतीजळगाववर्धासांगलीअहिल्यानगरछ. संभाजीनगरजालनाबीडलातूरधुळेजळगावरत्नागिरीचंद्रपूरसातारानाशिककोल्हापूरसिंधुदुर्गगडचिरोलीरायगड व नागपूर.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top